spot_img
अहमदनगरनगरमध्ये मोठी अवैध वाहतूक; कंटेनरसह एक कोटींचा मुद्देमाल जप्त

नगरमध्ये मोठी अवैध वाहतूक; कंटेनरसह एक कोटींचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहियानगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील खडकी शिवारात बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला. त्यात दहा ८४ लाख ९ हजार सहाशे रुपयांची अवैध दारू, २१ लाखांचा कंटेनर, १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाइल असा १ कोटी ५ लाख १९ हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता.०३) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दौड रस्त्याने नगरकडे दारुने भरलेला एक कंटेनर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधिक्षक राकेश ओला राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सोनोने, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचने नुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. प्रल्हाद गिते, दारुबंदी विभाग निरीक्षक घुगे, कुसळे उपनिरीक्षक रुपेश चव्हाण, उपनिरीक्षक नवनाथ घोडके, रविंद्र जाधव, उपनिरीक्षक रविंद्र झोळ, उत्पानशुल्क जवान गणेश पडवळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ शाहीद शेख, पोहेकॉ अरुण गांगुर्डे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोकॉ सागर मिसाळ यांच्या पथकाने खडकी शिवार येथे सापळा रचला.

कंटेनरला (के. ऐ. २५ ऐ. बी ५१ ६५ ) थांबण्याचा इशारा केला असता चालकाने कंटेनर रस्त्यावर सोडून लगतच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. कंटेनरचे मागील दरवाजे बंद असल्याने ते पोलिस ठाण्यात आणले. त्याची तपासणी केली असता त्यात दारू बाटल्यांचे बॉक्स मिळून आले. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...